Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे भाव उतरले; ग्राहकांची खरेदीसाठी लगबग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | सणासुदीच्या काळामध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. एखाद्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास आर्थिक भरभराट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सध्या दिवाळीनिम्मित सोने खरेदी करण्यावर ग्राहक जास्त भर देताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे, अशा काळात सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. यासोबत, चांदीचे भाव देखील घसरले आहेत. थोडक्यात, मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना चांगलाच होत आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, Good Returns नुसार मंगळवारी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,250 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,360 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,250 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,360 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे महिला वर्ग दागिने खरेदी करण्यावर जास्त भर देत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,250 रुपये
मुंबई – 56,250 रुपये
नागपूर – 56,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,360 रूपये
मुंबई – 61,360 रूपये
नागपूर – 61,360 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

विशेष बाब म्हणजे, आज चांदीच्या किमती देखील उतरले आहेत. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 745 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,450 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,500 रुपयांनी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई वाढली असली तरी सध्या स्थानिक पातळीवरील चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत.

प्लॅटिनमची किंमत

आजचे प्लॅटिनमचे भाव पाहता, 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,130 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,41,300 असा सुरू आहे. या कारणामुळे सराफ बाजारात मौल्यवान धातूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.