Gold Price Today| गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली होती. मात्र, नव्या वर्षात हेच सोन्या-चांदीचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या उलाढालीमुळे सोन्याचे भाव 57 हजारांवर आले आहेत. तसेच, चांदीच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल दिसून येत आहे.
सोमवारी, Good Return नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,050 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. सध्या सोन्याचे हेच भाव स्थानिक पातळीवर व्यवहार करत आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,800 रुपये
मुंबई – 57,800 रुपये
नागपूर – 57,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,050 रूपये
मुंबई – 63,050 रूपये
नागपूर – 63,050 रूपये
चांदीचे भाव
सोमवारी चांदीच्या भावात देखील ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. आज, 10 ग्रॅम चांदीचा भाव 764 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,640 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,400 अशी आहे. सोन्याबरोबर चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी वाव मिळाला आहे.