Gold Price Today : धनत्रयोदशी मुहुर्तावर सोन्या-चांदीचे भाव घसरले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| येत्या 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येईल. या दिवशी नविन मालमत्ता तसेच डाग दागिने खरेदी करण्यात येतात. त्यामुळे सध्या सराफ बाजारात सोन्याच्या दागिन्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आल्या आहेत. आनंदाची बाब म्हणजे, ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती देखील घसरल्या आहेत. तसेच, चांदीचे भाव उतरले आहेत. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. तुम्हाला देखील जर सोने खरेदी करायचे असेल तर आजचे सोन्याचे भाव नक्की तपासा.

बुधवारी Good Returns नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,100 रुपयांनी (Gold Price Today) व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,200 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,100 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे याकाळात सोने खरेदी केले तरी खिशाला कात्री बसणार नाही.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,100 रुपये
मुंबई – 56,100 रुपये
नागपूर – 56,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,200 रूपये
मुंबई – 61,200 रूपये
नागपूर – 61,200 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

धनत्रयोदशी जवळ आल्यामुळे चांदीचे भाव (Gold Price Today) देखील उतरले आहेत. सराफ बाजारात 10 ग्रॅम चांदीचा भाव 735 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,350 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 73,500 रुपयांनी सुरू आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई वाढली असली तरी सध्या स्थानिक पातळीवरील चांदीचे भाव घसरलेले दिसत आहेत.

धनत्रयोदशी मुहूर्त

यावर्षी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्त 12 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार आहे. तो 11 नोव्हेंबर रोजी 1 वाजून 57 मिनिटांनी संपेल. तसेच, सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त चालू होईल. हा मुहुर्त 7 वाजून 49 मिनिटांनी संपेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोने वा इतर नवीन धातू खरेदी करू शकता.