Gold Price Today : दोन महिन्यांत सोने 5 हजार रुपयांनी झाले स्वस्त, तरीही खरेदी का होत नाही ???

Sovereign Gold Bond
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : मंगळवारी भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर स्थिर राहिले तर चांदीच्या दरात मजबूती दिसून आली आहे. MCX वर जूनसाठीच्या सोन्याचा वायदा 50,975 रुपये प्रति 10 ग्रॅम वर स्थिर आहे तर चांदीचा वायदा 0.4 टक्क्यांनी वाढून 61,716 रुपये प्रति किलोवर आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारपेठेत सोन्याने 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठली होती. फेडरल रिझर्व्ह आणि इतर केंद्रीय बँकांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कडक भूमिका घेतल्याने एप्रिलच्या मध्यापासूनच सोन्यामध्ये घसरण होत आहे.

सोन्याचे आकर्षण कमी का झाले ?

मेहता इक्विटीजचे व्हीपी कमोडिटीज राहुल कलंत्री म्हणाले, “चलनविषयक कडक भूमिकेमुळे यूएस सरकारचे बॉण्ड यील्ड 3 टक्क्यांनी वाढले आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी झाले.”

जागतिक बाजारपेठेत सोन्याने मजबूती दाखवली. यूएस ट्रेडर्सच्या उत्पन्नात घट झाल्याने सोन्याला प्रामुख्याने आधार मिळाला. स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून $1,856.75 प्रति औंस झाले. तर दुसरीकडे चांदी 0.4 टक्क्यांनी वाढून 21.87 डॉलर प्रति औंस झाली. तसेच प्लॅटिनम 0.1 टक्क्यांनी वाढून 954.98 डॉलर प्रति औंस झाले. Gold Price Today

Gold rate today: Yellow metal rises over Rs 650, losses sheen; silver nears Rs 64,000 - The Economic Times

सोन्याचा सपोर्ट लेव्हल जाणून घ्या

कालेत्री पुढे म्हणाले कि, “सोन्याला 50,770-50,610 रुपयांवर सपोर्ट आहे, तर 51,280-51,550 रुपयांवर रेझिस्टन्स आहे. तसेच चांदीला 60,840-60,350 रुपयांवर सपोर्ट आणि प्रतिकार 62,150-62,510 रुपयांवर रेझिस्टन्स आहे.”

कोटक सिक्युरिटीजचे कमोडिटी रिसर्चचे प्रमुख रवींद्र राव म्हणाले, “चीनच्या अर्थव्यवस्थेतील वाढती जोखीम आणि सतत रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्याच्या खरेदीमुळे सपोर्ट मिळाला आहे. मात्र, फेडकडून आर्थिक कडकपणा आणि ETF चा आउटफ्लो वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. ते $1,850 प्रति औंसच्या जवळ स्थिर होण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर ही रॅली थांबली तर यूएस डॉलरमध्ये काही सुधारणा दिसू शकतील. Gold Price Today

Gold Rates As Per GoodReturs Website : https://www.goodreturns.in/gold-rates/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल; पहा आजचे दर

Taxation on Gold : आपल्याकडे असलेल्या सोन्यावर किती टॅक्स भरावा लागेल हे समजून घ्या

Kisan Vikas Patra : सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या दिवसात पैसे होतील दुप्पट

SBI ने ‘या’ डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली 0.90% पर्यंत वाढ

Indian Railway : ट्रेनमध्ये मिळणार बेबी सीट; महिला आणि बालकांसाठी रेल्वेचे खास गिफ्ट