‘या’ शुल्लक कारणावरून नागपूरमध्ये तरुणाची निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रागाने घुरून पाहिले म्हणून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या ( Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे नागपुरात दोन दिवसात हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. बारमध्ये समोरासमोर टेबलवर दारु पित बसलेल्या टोळक्यात खुन्नस देण्यावरुन वाद झाला. बारबाहेर पडल्यानंतर दोघे पुन्हा एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यानंतर आरोपीने जवळचा चाकू काढून तरुणाच्या मान आणि कंबरेवर सपासप वार करून त्याची निर्घृणपणे हत्या ( Murder)केली.

काय आहे प्रकरण ?
नागपूरच्या सदर परिसरात आरोपी विलसन आणि त्याचे मित्र एका बारमध्ये दारु पित बसले होते. यादरम्यान त्याच बारमध्ये मृत सागर संजय साहू हा सुद्धा मित्रांसोबत दारू प्यायला गेला होता. यावेळी दोघांचे टेबल समोरासमोर होते. मृत व्यक्ती आणि आरोपी तरुण यांच्यात अगोदरपासूनच जुना वाद होता.यादरम्यान मृत तरुणाने त्याच्याकडे घुरुन पाहिलं म्हणून दोघात पुन्हा वाद झाला.

यानंतर दोघेही बारबाहेर पुन्हा एकदा समोरासमोर आले आणि त्यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी आरोपीने स्वतः जवळ असलेला चाकू काढून मृत तरुणाच्या मानेवर आणि कंबरेवर वार केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत ( Murder) घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून बाकी आरोपींचा शोध सुरु आहे. नागपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा : 
49 रुपयांत 180 दिवसांचा रिचार्ज; ‘या’ टेलिकॉम कंपनीचा प्लॅन पहाच

Kisan Vikas Patra : सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या दिवसात पैसे होतील दुप्पट

ट्रेनमध्ये मिळणार बेबी सीट; महिला आणि बालकांसाठी रेल्वेचे खास गिफ्ट

संभाजीराजेंना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार?? शरद पवारांचं सूचक विधान

योगी सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार; ‘हे’ आहे कारण

Leave a Comment