नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सलग तिसर्या दिवशी घसरण दिसून आली. मागील सत्रात जोरदार घसरण झाल्यानंतर सोन्याच्या चांदीच्या किंमती आज भारतीय बाजारात पुन्हा घसरल्या आहेत. MCX वर सोन्याचे वायदे 0.10% घसरून 48,627 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 0.21% घसरून 70,663 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. या घसरणीनंतर 2 दिवसांत सोन्याची किंमत 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली.
मागील सत्रात भारतातील सोन्याचे दर 950 रुपये प्रति 10 म्हणजेच 2% ने कमी झाले होते. तसेच चांदी 2.5% म्हणजेच 1,800 प्रती किलोने खाली आली. जागतिक बाजारपेठेत अमेरिकन बाँडमधील घसरणीनंतर सोन्याचे दर 2 आठवड्यांच्या नीचांकावर घसरले. मागील सत्रात 2% घसरणानंतर स्पॉट सोन्याचे दर 0.4% घसरून 1,862.68 डॉलर प्रति औंसवर आला.
सोन्या-चांदीची आजची किंमत: सोन्याच्या किंमती आज 0.10% ने कमी झाल्या, त्यानंतर सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम खाली घसरून 48,627 रुपयांवर आल्या, तर चांदी 0.21% ने घटली. MCX वर चांदी 70,663 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत आहे.
आज स्वस्त सोन्याची खरेदी करण्याची आपल्याला चांगली संधी आहे
आजही आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना 2021-22 च्या तिसर्या सीरिज अंतर्गत स्वस्तपणे सोने खरेदी करू शकता. ही योजना 31 मे रोजी सुरू करण्यात आली आणि सलग 5 दिवस चालणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गोल्ड बाँड योजनेच्या तिसर्या सीरिजची इश्यू प्राईस 4,889 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. तुम्हाला प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 48,890 रुपये खर्च करावे लागतील.
याप्रमाणे शुद्धता तपासा
आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप तयार केले आहे. ‘BIS Care app’ सह ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंदर्भात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकेल. या अॅप (App) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा