नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमती (Gold Silver Price) खाली आल्या. ज्यामुळे आज सुरुवातीच्या व्यापारात सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकापेक्षा खाली आल्या. शुक्रवारी एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा दर प्रति 10 ग्रॅम 0.1 टक्क्यांनी घसरून 44,904 रुपयांवर, तर चांदीचा वायदा 1 टक्क्याने घसरून 67,100 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 105 रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर चांदीची किंमत प्रति किलो एक हजार रुपयांपर्यंत वाढताना दिसून आली. 2020 च्या ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले.
आजची सोन्याची किंमत
शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 44,904 रुपयांवर पोहोचले. मागील व्यापार सत्रात सोन्याच्या किंमतीत 105 रुपयांची वाढ झाली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 9 महिन्यांच्या नीचांकावर आहेत. सोन्याचा स्पॉट आज 0.4% घसरून 1,730.06 डॉलर प्रति औंसवर आला.
आजची चांदीची किंमत
दिल्ली सराफा बाजारात चांदीचा वायदा 1 टक्क्याने घसरून 67,100 प्रति किलो झाला. तर गुरुवारी चांदीचा भाव 1000 रुपयांनी महागला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी 0.6% घसरून 25.89 डॉलर वर तर प्लॅटिनम 0.7% घसरून 1,198.19 डॉलरवर बंद झाला.
देशांतर्गत बाजारात सोन्याला जोरदार मागणी आहे. लग्नाचा हंगाम सुरू आहे आणि किंमतीही खूप खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत मागणीचा दबाव आणखी वाढेल. या अर्थाने, किंमतीतील घसरण ही अल्प मुदतीची बाब आहे. सोने लवकरच परत येईल. म्हणूनच सोन्याचे दागिने खरेदी करण्याची हि सुवर्णसंधी आहे.
गुंतवणूकीसाठी सुवर्णसंधी
सोन्याच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. आतापर्यंत सोन्याची किंमत सुमारे 10 महिन्यांच्या पातळीवर आली आहे. अशामध्ये सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. चलनवाढीलाही आळा घालण्यास सोने मदत करते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group