हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज नरमाई दिसून येते आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आज भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे.
आज सकाळी MCX वर 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 75 रुपयांनी घसरून 51,351 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सध्या सोने मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.15 टक्क्यांनी घसरले आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसून येत आहे. आज सकाळी MCX वर चांदीचा भाव 395 रुपयांनी घसरून 57,931 रुपये किलो झाला. सध्या चांदी मागील बंद किंमतीपेक्षा 0.68 टक्क्यांनी खाली आहे. Gold Price Today
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,774.04 प्रति औंस होती. चांदीच्या स्पॉट प्राईसमध्ये आज घसरण दिसून आली आणि तो प्रति औंस $20.2 वर विकला गेला. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,680 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,650 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,680 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,350 रुपये
पुणे – 47,380 रुपये
नागपूर – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,650 रुपये
पुणे – 51,680 रुपये
नागपूर – 51,680 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4713.00 | Rs 4723.00 | 0.212 %⌃ |
8 GRAM | Rs 37704 | Rs 37784 | 0.212 %⌃ |
10 GRAM | Rs 47130 | Rs 47230 | 0.212 %⌃ |
100 GRAM | Rs 471300 | Rs 472300 | 0.212 %⌃ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5141.00 | Rs 5157.00 | 0.31 %⌃ |
8 GRAM | Rs 41128 | Rs 41256 | 0.31 %⌃ |
10 GRAM | Rs 51410 | Rs 51570 | 0.31 %⌃ |
100 GRAM | Rs 514100 | Rs 515700 | 0.31 %⌃ |
हे पण वाचा :
Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!
Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर