हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (20 डिसेंबर रोजी) भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ झाली आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या व्यापार सत्रात या दोन्ही धातूंचे भाव घसरले होते. MCX वर आज सोन्याचा भाव 0.22 टक्क्यांनी वाढला आहे. तसेच आज चांदीची किंमतही 0.37 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. काल MCX वर सोने 0.15 टक्क्यांनी आणि चांदी 0.23 टक्क्यांनी घसरली होती. Gold Price Today
आज सकाळी 9:15 पर्यंत फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर कालच्या बंद किंमतींवरून 122 रुपयांनी वाढून 54,382 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज MCX वर चांदी देखील ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर 248 रुपयांनी वाढून 67,760 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.11 टक्क्यांनी वाढून $1,793.01 प्रति औंस तर चांदीची किंमत 0.12 टक्क्यांनी घसरून $ 23.12 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 54,110 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,600 रुपये
पुणे – 49,600 रुपये
नागपूर – 49,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 54,110 रुपये
पुणे – 54,110 रुपये
नागपूर – 54,110 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
19 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
18 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
17 Dec 2022 | ₹ 5,078 | ₹ 40,624 | ₹ 5,332 | ₹ 42,656 |
16 Dec 2022 | ₹ 5,053 | ₹ 40,424 | ₹ 5,306 | ₹ 42,448 |
15 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
14 Dec 2022 | ₹ 5,113 | ₹ 40,904 | ₹ 5,369 | ₹ 42,952 |
13 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
12 Dec 2022 | ₹ 5,063 | ₹ 40,504 | ₹ 5,316 | ₹ 42,528 |
11 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
10 Dec 2022 | ₹ 5,073 | ₹ 40,584 | ₹ 5,327 | ₹ 42,616 |
हे पण वाचा :
सिमकार्डशिवाय Telegram वर साइन अप करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार जास्त व्याज
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा