नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होत आहे. परकीय चलनदरम्यान भारतीय बाजारात सोन्याची घसरण कायम आहे. मात्र, आज बुधवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ दिसून आली आमल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मधील सोन्याचा ऑगस्ट फ्यूचर्स 36 रुपयांनी वधारून 48,460 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याचबरोबर चांदीचा जुलै मधील वायद्याचा दर 227 रुपये किंवा 0.32 टक्क्यांनी वधारून 71,475 रुपये प्रतिकिलो होता.
एक महिन्याच्या नीचांकावर सोनं
MCX वर सोन्याचा वायदा 0.11% वाढून 48,476 रुपये प्रति 10 ग्रॅम वर गेला, जो एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर होता. तर चांदीचा वायदा 0.4 टक्क्यांनी वाढून 71,547 वर गेला. मागील सत्रात सोन्याचे दर 0.2% तर चांदी 0.8 टक्क्यांनी घसरली होती. आजपासून देशभरात टप्प्याटप्प्याने सोन्याचे दागिने आणि कलाकृतींचे हॉलमार्किंग अनिवार्य लागू केले गेले आहे. देशातील 256 जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल.
जागतिक बाजारात सोन्याची किंमत काय आहे?
जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या दरांनी चार आठवड्यांची सर्वात नीचांकी पातळी गाठली. स्पॉट सोन्याचे दर औंस 0.2% खाली घसरून 1,855.12 डॉलर प्रति औंसवर तर चांदी 0.1% खाली घसरून 27.62 डॉलर प्रति औंसवर बंद झाली. विश्लेषकांच्या मते, सोन्याचे दर सध्या 1,850 डॉलरच्या आसपास दिसत आहे आणि जर ही पातळी कमी झाली तर ते 1,800 डॉलर पर्यंत जाऊ शकते.
आपल्या शहरातील दर जाणून घ्या
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार बुधवारी 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 47,600 रुपये आणि चांदी 47,760 रुपयांवरून 71,500 रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,650 रुपयांवर आहे तर चेन्नईमध्ये ते 45,760 रुपयांपर्यंत आहे. मुंबईतील प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,600 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलो 400 रुपयांनी घसरून 71,500 रुपये प्रतिकिलोवर आला, जो मागील व्यापारात 71,900 रुपयांवर होता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा