Tuesday, January 7, 2025

Gold Price Today : सोन्या चांदीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण; खरेदीदारांना गोल्डनचान्स!

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चांदीच्या किमती दररोज बदलताना दिसत आहेत. परंतु याचा परिणाम स्थानिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंवर देखील होत आहे. जुलैनंतर आता सुरू असलेला ऑगस्ट महिना सोने चांदी खरेदी करण्यासाठी अगदी योग्य मानला जात आहे. या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमती उतरल्या आहेत. सराफ बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी सोने चांदीच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे याचा चांगला दिलासा ग्राहकांना मिळाला आहे.

MCX वेबसाईट शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,300 रुपये असा सुरू आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,320 रूपयांनी व्यवहार करत असल्याचे दिसत आहे. तसेच गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,650 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,620 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोने 50 रुपयांनी तर 24 कॅरेट सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमची किंमत 5,46,500 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 100 ग्रॅमची किंमत 5,96,200 रुपये अशी सुरू आहे.

Gold Price Today
Gold Price Today

सोन्याच्या किमतींसोबत (Gold Price Today) सराफ बाजारात चांदीच्या दरांवर देखील परिणाम होत असतो. मात्र आज म्हणजेच शनिवारी चांदीच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी असलेल्या भावानुसारच आज शनिवारी चांदी विकली जात आहे. आज 10 ग्रॅम चांदीची किंमत बाजारात 730 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चांदीचे भाव स्थित राहतील अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,650 रुपये
मुंबई – 54,650 रुपये
नागपूर – 54,650 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,620 रूपये
मुंबई – 59,620 रूपये
नागपूर – 59,620 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

दरम्यान, सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता.