Gold Price Today : सोन्याची चमक वाढली, चांदीही वधारली; आजचे दर पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईताच्या या दिवसात ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. आज 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Price Today) मोठी वाढ झालेली आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर चांदीची किंमत 78 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला आणखी चाप बसणार आहे. उत्पादन शुल्क, राज्यांचा कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतभर बदलतात.

Gold Price Today

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 56,650 रुपये
पुणे – 56,650 रुपये
नागपूर – 56,650 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 61,800 रुपये
पुणे – 61,800 रुपये
नागपूर – 61,800 रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.