Tuesday, January 7, 2025

Gold Price Today : ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या चांदीचे भाव पुन्हा नरमले; आजच्या किंमती वाचून व्हाल चकित

Gold Price Today | अमेरिकेत वाढलेल्या महागाईचा परिणाम सोने-चांदीच्या किमतींवर देखील झाला आहे. जागतिक पातळीवर सोने चांदीच्या किंमतीत पडझड होत असताना डॉलरच्या तुलनेत सोने पाच महिन्यांच्या नीचांकावर घसरले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सराफ बाजारीतील सोने चांदीच्या किमती बऱ्यापैकी घसरल्या आहेत. दररोज होणाऱ्या बदलांमुळे सोने चांदीच्या किंमती स्थिर राहताना दिसत नाहीत. कारण की, गुरुवारी पुन्हा सोने चांदीच्या किमती घसरल्या आहेत.

MCX वेबसाईट गुरूवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅमने 54,970 रुपये असा सुरू आहे. तर तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,970 रूपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर गुडरिटर्न्सनुसार, गुरूवारी सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,100 रूपयांनी सुरू आहे. त्याचबरोबर, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,020 रूपयांनी व्यवहार करत आहे. मुख्य म्हणजे, शहरी भागात देखील सोने याच किंमतीत व्यवहार करत आहे.

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 54,100 रुपये
मुंबई – 54,100 रुपये
नागपूर – 54,100 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 59,020 रूपये
मुंबई – 59,020 रूपये
नागपूर – 59,020 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

महत्वाचे म्हणजे, जागतिक पातळीवर होणाऱ्या बदलांचा परिणाम मौल्यवान चांदीच्या किमतीवर देखील झाला आहे. सध्या बाजारात चांदी मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. सध्या चांदीचा भाव सर्वसामान्यांना परवडणारा असल्यामुळे सोन्यासोबत चांदीची देखील खरेदी करण्यात येत आहे. गुरूवारी सराफ बाजारात, 10 ग्रॅम चांदीची किंमत 725 रुपये अशी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,250 रुपयांनी व्यवहार करत आहे. खालच्या भावानुसार आज 10 ग्रॅम चांदीमध्ये 5 रुपयांचा तर 100 ग्रॅम चांदीत 50 रुपयांचा फरक पडला आहे.

सोने-चांदीचे बदलते भाव

जानेवारी 2023 च्या महिन्यापासून सोने चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) सतत चढउतार पाहायला मिळत आहेत. सोने मधेच उसळी मारत आहे तर चांदी देखील नरमताना दिसत आहे. गेल्या तीन महिन्यात मौल्यवान धातूंच्या किमतीने उसळी मारली होती. मात्र आता जुलै महिन्यापासून या किमतींमध्ये घसरण होत आहे. मुख्य म्हणजे पुढील महिन्यापासून सोने चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मूल्यवान धातूंच्या किमती वाढल्या तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होऊ शकतो