Gold Price Today : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी!! सोन्या चांदीच्या किमतीत झाली घसरण; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सोन्याचे भाव 60 हजार रुपयांच्या खाली गेले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात देखील खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. आता सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे भाव घटले आहेत. 2 ऑक्टोंबर रोजी म्हणजे आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना लग्नसराईसाठी सोन्याची खरेदी करायची आहे त्या ग्राहकांसाठी आजचा दिवस सुवर्णसंधी सारखा चालून आला आहे.

Good Returns नुसार, आज सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरण झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,040 रूपये असा सुरू आहे. MCX वेबसाईटनुसार आजचे सोन्याचे भाव पाहिला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,890 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,790 रुपयांनी व्यवहार करत आहे. यातून आपल्याला समजते की, MCX वेबसाईटवरील सोन्याचे भाव वाढलेले आहेत. तर Good Returns वरील कमी झाले आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

 Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 53,200 रुपये

मुंबई – 53,200 रुपये

नागपूर – 53,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,040 रूपये

मुंबई – 58,040 रूपये

नागपूर – 58,040 रुपये

 

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

ग्राहकांना आज सोन्यासोबत चांदीचीही खरेदी देखील करता येणार आहे. कारण, आजच्या दिवशी चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे. 10 ग्रॅम चांदी आज 730 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 73,000 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे आज ग्राहक होण्यासोबत चांदीची देखील खरेदी करू शकतात.

प्लॅटिनमची किंमत

सोन्या चांदीसोबत प्लॅटिनम खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे आज प्लॅटिनम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो की, आज प्लॅटिनमच्या किमतीत वाढ झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,330 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,43,300 असा सुरू आहे.