Gold Price Today : सोने- चांदीच्या दरात मोठा बदल; पहा प्रतितोळा किती रुपये द्यावे लागतील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. आज गुरुवार २२ फेब्रुवारी २०२४ ला सोन्याच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यापासून सोने- चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत. २ दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती घसरल्या होत्या, आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ०.३ % ने वाढ होऊन ते प्रतितोळा ६२१२९ रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो 70705 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Good Return वेबसाईटनुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 5,7650 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 6,2880 रुपये आहे. तसेच चांदीचा 75000 रुपये प्रतिकिलो इतका आहे. सध्याचा काळ हा लग्नसराईताचा असल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांची पाऊले वळत आहेत. अशावेळी सोने- चांदीच्या दरात (Gold Price Today) होणार्या बदलाकडे सर्वांचे लक्ष्य राहत आहे.

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे– 57,500 रुपये
मुंबई – 57,500 रुपये
नागपूर – 57,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे– 62,830 रूपये
मुंबई – 62,830 रूपये
नागपूर – 62, 830रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.