हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खूप दिवसानंतर सोने चांदीच्या किमतीत (Gold Price Today) काल घसरण झाल्याने ग्राहकांच्या चेहऱ्यावरची चमक खुलली होती. मात्र ग्राहकांचा हा आनंद २४ तासही टिकला नाही. कारण आज २४ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव 71793 रुपये आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 203 रुपये म्हणजेच 0.28% वाढ पाहायला मिळाली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
MCX वर आज सकाळी ९ वाजता १० ग्राम २४ कॅरेट सोने ७१५६० रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र तासाभरातच या किमतीत लक्षणीय वाढ (Gold Price Today) पाहायला मिळाली. १० वाजता सोन्याचा भाव ७१८२५ रुपये झाला आणि त्यानंतर सोन्याची घोडदौड अजूनही सुरूच आहे. आत्ता ११ वाजून ३० मिनिटांनी १० ग्राम २४ कॅरेट सोने ७१८३० रुपयांवर व्यवहार करत आहे. आज दिवसअखेर या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २४ कॅरेट सोने ७२६५० रुपये आहे तर चांदी ८२९०० रुपये प्रतिकिलो आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 66,600 रुपये
मुंबई – 66,600 रुपये
नागपूर – 66,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 72,650 रूपये
मुंबई – 72,650 रूपये
नागपूर – 72,650 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.