हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने- चांदीच्या दरवाढीला (Gold Price Today) आज ब्रेक लागला आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 71511 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या किमती बघितल्या तर आजच्या किमतीत 0.25% म्हणजेच 181 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. मात्र थोडं काही होईना सोने स्वस्त झाल्याने ग्राहकांचा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
MCX वर चांदीच्या किमती सुद्धा उतरलेल्या पाहायला मिळत आहे. १ किलो चांदीचा भाव 80460 रुपये आहे. कालच्या तुलनेत या किमती 0.05% म्हणजेच 37 रुपयांनी कमी झाल्यात. दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत 7,2270 रुपये आहे तर १ किलो चांदीचा दर ८२५०० रुपये आहे. भारतात वेगवेगळ्या शहरानुसार सोन्याचे भाव (Gold Price Today) सुद्धा वेगवेगळे आहेत. त्याबाबत देशातील महत्वाच्या शहरात सोन्याच्या किमती किती आहेत ते आम्ही खाली सविस्तर सांगितलं आहे.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 66,600 रुपये
मुंबई – 66,600 रुपये
नागपूर – 66,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 72,650 रूपये
मुंबई – 72,650 रूपये
नागपूर – 72,650 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? Gold Price Today
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.