Gold Price Today । अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपल्या व्याजदरात वाढ केल्यानंतर गुरुवारी सोने चांदीच्या भावाने उसळी मारली आहे. गुड रिटन्सनुसार गुरुवारी, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,450 रुपये असा सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,490 रुपये असा सुरू आहे. यातूनच बुधवारी असलेल्या भावापेक्षा 22 कॅरेट सोन्याच्या किमती 300 रुपयांनी तर 24 कॅरेट सोन्याच्या किमती 330 रुपयांनी वाढलेलया दिसत आहे. बुधवारी, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 60,160 रुपये असा सुरू होता. मात्र आज या भावात 300 रुपयांचा फरक पडला आहे. यामुळे आता ग्राहकांना हे भाव कमी होईपर्यंत सोने खरेदी करण्यासाठी वाट बघावी लागणार आहे.
सोन्याच्या भावांबरोबर (Gold Price Today) चांदीचे दर देखील वाढलेले दिसत आहेत. आज बाजारात चांदी 10 ग्रॅम भावासाठी 784 रुपये सुरू आहे. कालच्या दरानुसार चांदीत 10 रुपयांचा फरक पडला आहे. याचबरोबर, आज 100 ग्रॅम चांदीचा दर 7,440 रुपयांनी सुरू आहे. पूर्वीच्या दरापेक्षा यामध्ये देखील 100 रुपयांचा फरक पडला आहे. बुधवारी बाजारात चांदी 10 ग्रॅम दरासाठी 774 रुपयांनी विकली जात होती.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,450 रुपये
मुंबई – 55,450 रुपये
नागपूर – 55,450 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,490 रूपये
मुंबई – 60,490 रूपये
नागपूर – 60,490 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.