Gold Price Today | गेल्या दोन महिन्यांपासून सोने चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. आता सोने चांदीच्या दरात मागील काही दिवसांच्या वाढीनंतर पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. आज बाजारात सोन्याचे भाव घसरले आहेत. सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी मोठी संधी आहे MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,760 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 60,830 रूपयांनी व्यवहार करत आहे.
तर गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार ही सोन्याच्या किमती आज (Gold Price Today) घसरल्या आहेत. गुरुवारी गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम भाव 54,950 रूपयांनी सुरू आहे. याचबरोबर, 24 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 59,950 रूपयांनी व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोने 100 ग्रॅमने 5,49,500 रुपयांना विकले जात आहे. बुधवारी हाच दर 100 ग्रॅमने 5,51,000 रुपये असा होता. यामध्ये आता 1,500 रुपयांचा फरक पडला आहे.
याशिवाय सराफ बाजारात चांदीच्या भाव देखील उतरले आहेत. बुधवारनंतर चांदीचा भावात 23 रूपयांची कमी झाला आहे. आज बाजारात चांदी 10 ग्रॅमने 750 रूपयांनी व्यवहार करत आहे. 100 ग्रॅम चांदीचा भाव बाजारात 7,500 रुपये सुरू आहे. जागतिक पातळीवरील होणाऱ्या बदलांमुळे सोने चांदीच्या भावात हा फरक दिसून येत आहे. आता ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सणामुळे हे भाव कमी जास्त होऊ शकतात.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे– 54,950 रुपये
मुंबई – 59,950 रुपये
नागपूर – 59,950 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे– 59,950 रूपये
मुंबई – 59,950 रूपये
नागपूर – 59,950 रुपये
दरम्यान, सराफ बाजारात रोज सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहक सराफ दुकानात जाऊन सतत सोने चांदीच्या भावांची चौकशी करू शकत नाही. त्यामुळेच २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठी ग्राहक 8955664433 वर मिस कॉल करू शकता. यानंतर थोड्याच वेळात तुमच्या फोनवर एसएमएस द्वारे सोन्याचे भाव सांगितले जातील. तसेच , रोजच्या अपडेटसाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला ही भेट देऊ शकता. यामुळे व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबली जाऊ शकते.