हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन दिवसांच्या (Gold Price Today) घसरणीनंतर आज बुधवार 30 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याची किंमतीत सुरुवातीच्या व्यवहारात 0.12 टक्क्यांनी वाढली आहे. त्याच वेळी, आज चांदी देखील फ्युचर्स मार्केटमध्ये 0.05 टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहे.
बुधवारी फ्युचर्स मार्केटमध्ये (Gold Price Today) 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 9:20 वाजेपर्यंत कालपेक्षा 65 रुपयांनी वाढून 52,373 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. याशिवाय मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या किमती सुद्धा वाढलेल्या पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव कालच्या बंद भावापेक्षा 33 रुपयांनी वाढून आज 61,184 रुपयांवर व्यवहार करत आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,970 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक (Gold Price Today) सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत