Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चांदीचे भाव रोज बदलताना दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सोने – चांदीचे भाव पूर्णपणे घसरले होते. तर आता जुलै महिन्याच्या अखेरीस देखील सोने चांदीच्या भावात घसरण झाल्यची दिसत आहे. आज 31 जुलै 2023 रोजी बाजारात MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,970 रूपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 61,060 रूपयांनी व्यवहार करत आहे.
तर गुड रिटन्सनुसार, आज 31 जुलै रोजी सोन्याचे भाव (Gold Price Today) घसरलेले दिसत आहेत. सोमवारी, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,250 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,280 रुपयांनी सुरू आहे. त्यामुळे कालच्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याच्या भावात 100 तर 24 कॅरेट सोन्याच्या भावात 100 रुपयांचा असा समान फरक पडला आहे.
गेल्या दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीमध्ये ही तेजी दिसून येत आहे. मात्र आज चांदीचे भाव स्थिर आहेत. चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. आजनुसार आज बाजारात चांदी 10 ग्रॅम भावासाठी 770 रुपयांनी विकली जात आहे. तर 100 ग्रॅम भावासाठी चांदी 7,700 रुपयांनी सुरू आहे. शनिवारनंतर चांदीचे आजचे भाव देखील स्थिरच दिसत आहेत.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे– 55,250 रुपये
मुंबई – 55,250 रुपये
नागपूर – 55,250 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे– 60,280 रूपये
मुंबई – 60,280 रूपये
नागपूर – 60,280 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सराफ बाजारात सोन्याच्या शुद्धतेमध्ये मोठी फसवणूक केल्याचे पाहायला मिळते. त्यासाठी यावर उपाय म्हणून सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतो. या ॲपद्वारे आपण सोन्याची शुद्धता पासून त्याबाबत तक्रार देखील नोंदवू शकतो. या ॲपमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबत करण्यात आलेल्या फसवणुकीवर आळा बसल्यास मदत होते.