Gold Price Today | रक्षाबंधन झाल्यापासून स्थानिक पातळीवरील सोन्या चांदीचे भाव उतरले आहेत. बुधवारी सोन्या चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा दिवस देखील सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अगदी योग्य आहे. गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर महागाई वाढली आहे. त्यामुळे याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर ही होत आहे. मात्र आता कालपासून सोन्या चांदीच्या किमती घसरण्यास सुरुवात झाली आहे.
Good Return वेबसाईटच्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी सोन्याच्या किमती (Gold Price Today) घसरले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,000 रुपये सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. मात्र यापूर्वी 10 ग्रॅम सोने 55,150 ने व्यवहार करत होते. तर 22 कॅरेट 10 ग्रॅमने 60,160 रुपये व्यवहार करत होते. त्याचबरोबर, MCX वेबसाईटनुसार, आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,500 रुपये सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60,160 रुपयांनी व्यवहार करत आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,000 रुपये
मुंबई – 55,000 रुपये
नागपूर – 55,000 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,000 रूपये
मुंबई – 60,000 रूपये
नागपूर – 60,000 रुपये
चांदीचे आजचे भाव
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, आज चांदीच्या किमती देखील (Gold Price Today) उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चांदीचे भाव गगनाला भिडले होते. मात्र आता या चांदीत कमालीची घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम चांदी 747 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7470 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी 74,700 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे आज ग्राहक आरामात चांदीची खरेदी करू शकतात.
सोन्याचे दागिने
सराफ बाजारात सोन्याच्या दागिन्यांच्या अनेक नवनवीन व्हरायटीज येत आहेत. सध्या महिलांना दागिन्यांमध्ये नाजूक डिझाईन जास्त आवडत असल्यामुळे अशा दागिन्यांची मागणी जास्त वाढत आहे. मात्र असे दागिणे खरेदी करताना दागिन्यांच्या किमतीसह कामगारांच्या मेहनतीचे पैसे देखील द्यावे लागतात. त्यामुळे जितकी नाजूक डिझाईन असेल तितकेच त्या दागिन्यांची किंमत वाढली जाते.