नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरण झाल्यामुळे आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे . त्याचबरोबर चांदीच्या किंमतीही आज घसरल्या आहेत. यासह चांदीची किंमत 70,000 रुपये प्रती किलो झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 48,259 रुपयांवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीचा दर प्रति किलो 70,465 रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीही खाली आल्या, तर चांदीत फारसा बदल झाला नाही.
सोन्याची नवीन किंमत
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरामध्ये 152 रुपयांची घट नोंदली गेली. यामुळे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमच्या आसपास 48,000 रुपयांवर पोहोचले. 99.9 टक्के शुद्ध सोन्याची नवीन किंमत आता राजधानी दिल्लीत प्रति 10 ग्रॅम 48,107 रुपयांवर गेली आहे. ट्रेडिंग सेशनच्या आधी सोन्याच्या दर प्रति 10 ग्रॅम 48,259 रुपयांवर बंद झाले होते. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1,883 डॉलरवर गेली.
चांदीची नवीन किंमत
चांदीच्या किंमतीतही आज घसरण होत आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव सोमवारी 540 रुपयांनी घसरून 70,000 रुपयांपर्यंत खाली आला. दिल्ली सराफा बाजारात चांदी आज 69,925 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. यापूर्वी व्यापार सत्रात चांदीचा भाव प्रतिकिलो 70,465 रुपयांवर बंद झाला होता. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत कोणतेही विशेष बदल झाले नाहीत आणि ते औंस 27.55 डॉलरवर राहिले.
सोने का घसरले ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की,” न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंज कॉमेक्स (COMEX) मधील स्पॉट सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली. त्याच वेळी इतर चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत झाला. यामुळे दिल्ली सराफा बाजारात मौल्यवान पिवळ्या धातूच्या किंमतीतील घसरण नोंदली गेली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा