Gold Price : सोन्याची शुद्धता कशी ओळखावी ??? कॅरेटमध्ये सोन्याचे संपूर्ण गणित समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : आपण जेव्हा सोने खरेदी करतो तेव्हा त्याच्या शुद्धतेपेक्षा किंमतीला जास्त महत्त्व देतो. यावेळी आपण सोन्याच्या शुद्धतेऐवजी किंमतींची तुलना करत बसतो. मात्र ही एक मोठी चूक ठरू शकते कारण सोन्याची शुद्धता खूप महत्त्वाची ठरते. कारण त्यामुळेच सोन्याच्या किंमतीतील तफावत ठरवली जात असते. मात्र जर आपण गुंतवणुक म्हणून किंवा वैयक्तिक वापरासाठी सोने खरेदी करत असाल तर त्याच्या शुद्धतेकडे लक्ष द्यायलाच हवे.

लोकांकडून नेहमी शुद्ध सोन्यामध्ये गुंतवणूक केली जावी, असे मत अनेक तज्ञ व्यक्त करतात. कारण सोन्यामध्ये इतर धातूंचा वापर केल्यास त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि ज्यामुळे गुंतवणुक म्हणून सोने खरेदी केले असेल तर कालातंराने त्याची किंमत कमी होऊ शकते. Gold Price

Gold rates today rise but still down ₹2,000 in 10 days | Mint

दागिने आणि गुंतवणुक म्हणून कोणत्या दर्जाचे सोने खरेदी करावे ???

दागिन्यांच्या बाबतीत, बोलायचे झाले तर 18K किंवा 22K सोन्याची खरेदी करणे चांगले ठरेल. कारण ते शुद्धतेच्या दृष्टीने योग्य आणि जास्त टिकाऊ आहे. मात्र, सोन्याच्या नाण्यांच्या बाबतीत सोन्याची शुद्धता 99.99% असते तर सोन्याचे मार्केट स्टॅण्डर्ड 99.5% किंवा 99.9% आहे. Gold Price

Gold rates today fall again, down over ₹1,000 this week, silver slumps | Mint

Millisimal fineness System म्हणजे काय???

Millisimal fineness ही सोन्याची शुद्धता दाखविणारी एक सिस्टीम आहे. ज्यामध्ये सोन्याची शुद्धता कॅरेटऐवजी प्रति हजार किंवा सोन्याच्या टक्केवारीत मोजली जाते. यानुसार, 999 म्हणजे 24K सोने 99.90% शुद्ध असते आणि त्यामध्ये इतर धातूंचे मिश्रण फक्त 0.1% असते. त्याचप्रमाणे 999.9 म्हणजे तुमचे सोने 99.99% शुद्ध आहे आणि त्यामध्ये फक्त 0.01% इतर धातू मिसळले गेले आहेत.

त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी आपण नेहमी ज्वेलर्स, बँक किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सोन्याच्या शुद्धतेबाबत विचारणा करायला हवी. उदाहरणार्थ, MMTC-PAMP आणि SafeGold गोल्डची शुद्धता 99.99% आहे. साधारणपणे, दागिन्यांमध्ये सोने हे 14K, 18K, 22K पर्यंतच्या शुद्धतेच्या वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये येते.

Gold rates today fall to lowest in nearly 4 months | Mint

शुद्ध सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील का???

आता प्रश्न असा उदभवतो कि, जास्त शुद्धता असलेले सोने खरेदी करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील का? याबाबत तज्ज्ञ सांगतात की, शुद्ध सोन्याची खरेदी करण्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही.

उच्च शुद्धतेच्या बाबतीत सोन्याचा हेडलाइन दर जास्त असेल. कारण हा दर थेट शुद्ध सोन्याच्या अतिरिक्त ग्रॅमशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, जर 995 चा दर रुपये 5000/ग्रॅम असेल, तर 999.9 चा दर 5000 x 999.9/995 = 5024.62/ग्रॅम असेल. Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :https://www.bis.gov.in/index.php/hallmarking-overview/?lang=en

हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ 6 योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!
Train Cancelled : रेल्वेकडून 159 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, नवीन दर पहा
‘या’ दिवाळी सेलमध्ये स्वस्त दरात iPhone 13 मिळवण्याची संधी !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल