Gold Rate : सोने 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांनी सांगितले कारण

Gold Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate । सोने हा भारतात खूप मौल्यवान मानलं जाते. लग्नसराईतच्या कार्यक्रमात सोने तर लागतच, पण काहीजण हौसमौजेसाठी सोन्याचे दागिने खरेदी करतात, तर काही जण सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याकडे बघतात. त्यामुळे सोन्याची किंमत किती आहे? याकडे सर्वांचेच लक्ष्य असत. भारतात मागच्या काही दिवसांत सोन्याचे भाव लाखोंच्या पार गेले होते. मधल्या काळात हे दर बरेच आटोक्यात आले. सध्या सराफा मार्केट मध्ये सोने ९६ हजारांच्या आसपास व्यवहार करत आहे. मात्र येत्या काही दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल १२००० रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे. केडिया अ‍ॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी याबाबतच अंदाज वर्तवला असून त्यामागील कारणेही सांगितली आहेत.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याचे दर (Gold Rate) कमी झाले होते. सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम मागे २००० रुपयांची घट झाली होती. आता येत्या काळात सोने आणखी स्वस्त होऊ शकते असं अजय सुरेश केडिया याना वाटत. त्यांच्या मते ज्याप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात सोन्यात सुमारे १०% सुधारणा झाली होती, त्याचप्रमाणे येत्या काळात त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,०००-८५,००० च्या पातळीवर येऊ शकते.

दर कमी होण्याची कारणे काय असू शकतात? Gold Rate

१) सोन्याने विक्रमी उच्चांक गाठताच, मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ETF मध्ये प्रचंड हालचाल झाली, परंतु आता हे पैसे इतर मालमत्तांमध्ये सरकत आहेत. यामुळे सोन्यावरील किंमत आधार कमकुवत झाला आहे.

२) सोन्याला सामान्यतः सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, परंतु जेव्हा जगात संकट किंवा तणाव कमी होतो तेव्हा त्याची मागणी कमी होऊ लागते. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी झाला आहे आणि भारत-पाकिस्तान तणाव देखील सध्या थंडावला आहे. यामुळेच गुंतवणूकदारांचा रस दुसरीकडे सरकत आहे.

६ जून रोजी होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीकडेही सर्वांचे लक्ष आहे. जर आरबीआयने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रेपो दरात कपात केली तर त्याचा सोन्याच्या किमतींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि सोन्याच्या किमती (Gold Rate) घसरू शकतात.