मागच्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढ उतार होताना दिसत आहे. केवळ दागिने म्हणून नाही तर सोने गुंतवणूकीचा देखील चांगला पर्याय मनाला जातो. म्हणूनच ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे दिसून येतो. सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाखांपर्यंत जाणार असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे.
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. तर आज सलग आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 13,100 रुपयांची घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये 12,000 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया आजचे 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दहा आणि एक ग्रॅम चे दर काय आहेत.
22 कॅरेट
आज एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 7,080 रुपये इतका आहे. हाच दर काल 7200 इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 120 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज दहा ग्रॅम सोन्याचा 22 कॅरेटचा दर 70,800 रुपये इतका आहे. हाच दर काल 72 हजार रुपये इतका होता म्हणजेच आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 1200 रुपयांची घसरण झाली आहे.
24 कॅरेट
24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्याच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,724 रुपये इतका आहे. हाच दर काल 7855 इतका होता. म्हणजेच आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 131 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार 240 रुपये इतका आहे हाच दर काल 8 हजार 550 रुपये इतका होता. म्हणजेच आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दारामध्ये 1310 रुपयांची घवघवीत घसरण झालेली दिसून येत आहे.
चांदीच्या दरात घसरण
आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे दिसत आहे. दहा ग्रॅम चांदी आज 20 रुपयांनी स्वस्त होऊन 895 वर आली आहे. तर शंभर ग्राम चांदी दोनशे रुपयांनी घसरून 8950 रुपयांवर आली आहे. याशिवाय एक किलो चांदीचा दर आज 89,500 इतका झाला आहे.