Gold Rate Today : खुशखबर ! आज सोन्याच्या दारात घसरण, पहा 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागतील?

0
212
gold rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Rate Today : मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारामध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे दर अगदी अवाक्या बाहेर जाऊन पोहोचले आहेत. एवढेच नाही तर काही तज्ञांनी सोनं एक लाखांपर्यंत प्रति तोळा जाणार अशी शक्यता देखील व्यक्त केली होती. मात्र आज काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली असून आज सोन्याच्या दारामध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे (Gold Rate Today) आजचे भाव नक्की काय आहेत चला पाहुयात…

आज दिनांक 4 मार्च रोजी सोन्याच्या दरामध्ये थोडीशी घसरण झालेली दिसून येत असून देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 86 हजार सहाशे रुपये इतका झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या बाबतीत सांगायचा झाल्यास बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव 79हजार 300 रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव प्रति किलो 96 हजार 900 रुपयांच्या (Gold Rate Today) पातळीवर आहे.

आपण जाणतोच की सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. डॉलरच्या किमतीवर ही सोन्याचा दर अवलंबून असतो. आता डॉलरच्या तेजीमुळे सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. मेहता इक्विटीचे राहुल कलंत्री यांच्या मते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी मेक्सिको आणि कॅनडावर नवीन आयात शुल्क लागू केल्यानंतर डॉलर मजबूत झाला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे. तसेच फेडरल रिझर्व व्याजदर कपात पुढे ढकलणार असल्याच्या शक्यतेमुळे सोने (Gold Rate Today)बाजारावरील दबाव वाढला आहे.

मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा दर 79,390 रुपये इतका आहे. तर आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या साठी तुम्हाला 86 हजार 610 रुपये प्रति तोळा मोजावे लागतील.

दरम्यान आपण जाणतोच की भारतामध्ये सोन केवळ गुंतवणूक म्हणून नाही तर भारतात सोन्याला विशेष मागणी आहे. सण समारंभात सुद्धा सोन्याची खरेदी आपल्या देशात आवर्जून केली जाते. सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे सोन्याच्या दरात झालेली घसरण ही खरेदीदारांना दिलासादायक ठरणार आहे.