थरारक…मैत्री करून दागिन्यांची ऑर्डर देत सोनाराचा केला खून; मृतदेह पुरला पर जिल्हयात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड | सोने खरेदीचा बहाना करून बोलावून घेऊन तरुण सुवर्ण व्यवसायिक विशाल सुभाष कुलथे वय (25) यांचा खून केल्याची घटना जिल्हयातील शिरूर कासार येथे घडली असून, तीन आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. आरोपीने मैत्री करीत किरकोळ सोने घेत मोठी ऑर्डर दिली व त्याचा खून केल्याने संपूर्ण व्यापारी जगतात खळबळ उडाली आहे.

विशाल कुलथे हा हरवल्याची फिर्याद 21 मे रोजी कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली. तपासादरम्यान विशाल हरवला नसून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसही सुन्न झाले. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांची शिरूर येथील जिजामाता चौकात सलूनचे दुकान आहे. सोने खरेदीच्या निमित्ताने त्याने विशाल कुलथेशी मैत्री केली. थोडेफार सोने खरेदी करून विश्वास संपादन केला. माझे लॉकडाऊन मध्ये लग्न झाले आहे. जास्तीचे सोन्याचे दागिने करायचे असे सांगून, त्याने ऑर्डर दिली. दागिने तयार झाल्यानंतर कुलथे यांनी ज्ञानेश्वरला दागिने घेऊन जाण्यास सांगितले. मात्र गायकवाड यांनी दागिने घेऊन त्याला सलून मध्ये बोलवले. तेथे ज्ञानेश्वर गायकवाड यांचे दोन साथीदार केतन संतोष लोमटे (19 रा.भातकुडगाव) आणि धीरज मांडकर (19 रा. पाथर्डी) हे दबा धरून बसले. कुलथे याने सोने आणले याची खात्री पटल्यानंतर या तिघांनी त्याच्या मानेत कैची खुपसून खून केला.

ज्ञानेश्वर याने मृतदेह शेतात नेला शेतात नेल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांना आपण खून केला असून मृतदेह पुरण्यासाठी जेसीबी बोलवा असे सांगितले. मात्र वडिलांनी फावडे आणले. त्यानंतर खड्डा खोदून मृतदेह शोधण्यात आला.पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने वापरलेले खोरे टोपले आधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खून शिरूरमध्ये मृतदेह पुरण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात
कुलथे हा सोनी घेऊन आल्याची खात्री त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केल्यानंतर गळ्यात कैची खुपसून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह गोधडीत लपेटून दुचाकीवर घेऊन तो अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील आरोपीच्या शेतात नेऊन पुरला.

Leave a Comment