Gold-Silver Price : सोने महागले तर चांदी किरकोळ वाढली, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. या सप्ताहात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 354 रुपयांनी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरात 8 रुपयांनी किरकोळ वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (4 ते 8 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,485 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,839 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 66,628 रुपयांवरून 66,636 रुपये प्रति किलो झाली आहे.

IBGA ने जाहीर केलेल्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जपूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र किंमतींमध्ये GST समाविष्ट नाही.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले ?
4 एप्रिल 2022- रुपये 51,485 प्रति 10 ग्रॅम
5 एप्रिल 2022- रुपये 51,451 प्रति 10 ग्रॅम
6 एप्रिल 2022- रुपये 51,578 प्रति 10 ग्रॅम
7 एप्रिल 2022- रुपये 51,790 प्रति 10 ग्रॅम
8 एप्रिल 2022- रुपये 51,839 प्रति 10 ग्रॅम

गेल्या एका आठवड्यात चांदीचा दर किती बदलला ?
4 एप्रिल 2022- रुपये 66,628 प्रति किलो
5 एप्रिल 2022- रुपये 66,468 प्रति किलो
6 एप्रिल 2022- रुपये 65,919 प्रति किलो
7 एप्रिल 2022- रुपये 66,019 प्रति किलो
8 एप्रिल 2022- रुपये 66,636 प्रति किलो

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत सोन्याची आयात $45 अब्ज झाली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती.

Leave a Comment