फसवणूक रोखण्यासाठी अन् ग्राहक सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची RBI ची घोषणा

नवी दिल्ली । वाढते ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन आणि ऑनलाइन सर्व्हिसेससह आर्थिक क्षेत्रात नवीन कंपन्यांच्या येण्याने ग्राहकांची होणारी फसवणूकही वाढली आहे. बनावट कंपन्यांच्या फसवणुकीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. अलिकडील वर्षांत, अशा अनेक बातम्यांनी मीडियामध्ये चर्चा झाली आहे ज्यात असे सांगण्यात आले आहे की, सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्व लोकं ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले आहेत. हे थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक आता कठोर पावले उचलणार आहे.

रिझर्व्ह बँकेने ग्राहक सेवा सुधारण्यासाठी एक पॅनल तयार करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी चलनविषयक धोरणाची घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,”ग्राहक संरक्षणाचा आढावा घेण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी लवकरच एक पॅनेल तयार केले जाईल.”

नवीन सेवांद्वारे होत आहेत बदल
RBI गव्हर्नर म्हणाले, “रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षांत ग्राहक संरक्षण वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. या उपायांमध्ये ग्राहक सेवेबाबत नियामक फ्रेमवर्क तयार करणे, अंतर्गत तक्रार निवारण आणि लोकपाल यंत्रणा यांचा समावेश आहे.” ते म्हणाले की,” फायनान्स कंपन्यांकडून नवीन सेवा आणि उत्पादने सादर करणे, डिजिटल सेवांची वाढती लोकप्रियता आणि विविध सेवा पुरवठादार या क्षेत्रात येत असल्याने आर्थिक परिदृश्य झपाट्याने बदलत आहे.” ग्राहक सेवेची सद्यस्थिती तपासण्यासाठी आणि पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

हवामानाशी संबंधित आर्थिक जोखीम देखील संरक्षित केली जाईल
त्यांनी असेही सांगितले की,” पर्यावरणाशी संबंधित आर्थिक जोखमींच्या संभाव्य परिणामांचे आणखी चांगल्या प्रकारे आकलन आणि मूल्यांकन सुलभ करण्यासाठी Climate Risk and Sustainable Finance यावरील फिडबँकसाठी चर्चा पेपर लवकरच प्रकाशित केला जाईल.” Climate Risk and Sustainable Finance सेक्टर मधील काही नियामक उपक्रम हवामान धोक्याच्या चांगल्या हाताळणीत मदत करतील आणि आणीबाणीच्या वेळी त्यांना मार्गदर्शन करतील.