हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली सराफा बाजारात आज म्हणजेच 17 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते तर चांदीचा भाव 65,746 रुपये प्रति किलोवर बंद झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
सोन्याची किंमत
दिल्लीत सोन्याचा भाव 402 रुपयांनी घसरून 48,116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील व्यापारात, त्याची किंमत 48,518 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. चांदीचा भाव 528 रुपयांनी घसरून 65,218 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,857 डॉलर प्रति औंस आणि चांदी किंचित वाढून 25.03 डॉलर प्रति औंस झाली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, कॉमेक्स ट्रेडिंगवर स्पॉट गोल्डच्या किमतीसह सोन्याच्या किमती मजबूत आहेत. ते म्हणाले की बुधवारी ते 0.37 टक्क्यांनी वाढून $1,857 प्रति औंस वर ट्रेड करत होते. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47520 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50850 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49360 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48370 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49370 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48360 रुपये
पुणे – 47520 रुपये
नागपूर – 48370 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49360 रुपये
पुणे – 50850 रुपये
नागपूर – 49370 रुपये