Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती जाणून घ्या

Sovereign Gold Bond
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीही महागली आहे. या ट्रेडिंग वीकमध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 428 रुपयांनी वाढला आहेतर चांदीच्या दरात किलोमागे 1004 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (21 ते 25 मार्च) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,464 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,892 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 67,687 रुपयांवरून 68,691 रुपये प्रति किलो झाली आहे.

IBGA ने जारी केलेल्या किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्ज पूर्वीच्या आहेत. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र किमतींमध्ये GST चा समावेश नाही.

गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
21 मार्च 2022- रुपये 51,464 प्रति 10 ग्रॅम
22 मार्च 2022- रुपये 51,504 प्रति 10 ग्रॅम
23 मार्च 2022- रुपये 51,637 प्रति 10 ग्रॅम
24 मार्च 2022- रुपये 51,818 प्रति 10 ग्रॅम
25 मार्च 2022- रुपये 51,892 प्रति 10 ग्रॅम

गेल्या एका आठवड्यात चांदीचे दर किती बदलले
21 मार्च 2022- रुपये 67,687 प्रति किलो
22 मार्च 2022- रुपये 67,775 प्रति किलो
23 मार्च 2022- रुपये 67,734 प्रति किलो
24 मार्च 2022- रुपये 67,864 प्रति किलो
25 मार्च 2022- रुपये 68,691 प्रति किलो

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत सोन्याची आयात $45 अब्ज झाली
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशाची सोन्याची आयात 73 टक्क्यांनी वाढून $45.1 अब्ज झाली आहे. मागणी जास्त असल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यासह, मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात $26.11 अब्ज होती.