नवी दिल्ली । आज सोमवारी दिवसाची सुरुवात होताच सोन्याच्या दरांमघ्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली. सकाळी जवळपास ९.३० वाजण्याच्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर जवळपास १०५ रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर प्रतितोळा ४८ हजार ४१० रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदी १८५ रुपयांच्या वाढीव किंमतीसह प्रती किलो ४८ हजार ५५० इतक्या दरावर पोहोचली.
सोन्याचे भाव आणखी वधारणार
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्यात रस दाखवण्यात सुरुवात केली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पुढील काही महिन्यांपर्यंत सोन्याचे दर प्रतितोळआ 52 हजारांच्याही पलीकडे पोहोचू शकतात. इतकंच नव्हे तर, येत्या दोन वर्षांमध्ये सोन्याचे दर 65 हजारांच्या घरात पोहोचू शकतात.
सोन्यात गुंतवणूक वाढणार
सराफा बाजाराच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार जगातील सर्वाधिक मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये गुंतवणूक वाढण्याची चिन्हं आहेत शिवाय येत्या काळात सोन्याचे दर तेजीत असल्याचं पाहायला मिळेल. कमोडिटी बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार जगभरातील मोठ्या बँकांनी व्याज दरात कपात केली आहे. सद्यस्थिती पाहता आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”