शेतकर्‍यांसाठी महत्वाचं! असा काढायचा असतो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातबारा काढायचा म्हणजे लोक नेहमीच वैतागतात कारण एका सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयात बऱ्याच चकरा माराव्या लागतात. आता मात्र सरकारने हा व्याप कमी करत अवघ्या काही वेळातच ऑनलाईन स्वाक्षरीच्या सातबाऱ्याची व्यवस्था केली आहे. तो कसा काढायचा याची माहिती यामध्ये देत आहोत. सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in वर जायचे आहे. आपण इथे महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटवर जातो. इथे उजव्या बाजूला डिजिटल स्वाक्षरी सातबारा असा पर्याय दिसेल. ज्यावरून तुम्ही अगदी ५ मिनिटात सातबारा काढू शकाल.

डिजिटल स्वाक्षरी सातबारावर क्लीक केल्यावर आपला सातबारा नावाचे पेज समोर येते. आधीच्या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर इथे नवी नोंदणी करण्याची गरज नाही मात्र नव्यानेच या वेबसाईटवर आला असाल तर न्यू युजर रेजिस्ट्रेशन वर क्लीक करून वैयक्तिक माहिती, कामाची माहिती, संपर्क, पत्ता, पिनकोड अशी माहिती भरायची आहे. यानंतर तुम्हाला स्वतःचा लॉग इन आयडी बनवायचा आहे. तो बनवून झाल्यावर तसा आयडी आणखी कुणाचा आहे का हे चेक अवेलीबिलिटी या पर्यायावर क्लीक करून तपासून पुढे जाऊन आपला पासवर्ड तयार करावा लागेल. यानंतर काही अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन सबमिट करायचे आहे. ही नोंदणी झाल्यावर पुन्हा सातबाऱ्याच्या पेजवर जाऊन आपले युजर नेम आणि पासवर्ड टाकून पेज उघडायचे आहे.

आपण नवीनच नोंदणी केल्यामुळे आपल्या खात्यात काहीच पैसे नसतात. त्यामुळे आधी आपल्या खात्यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंग द्वारे पैसे जमा करायचे असतात. त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या पेजवर जाऊन आपल्या जिल्ह्याचे, तालुक्याचे नाव टाकायचे आहे. यानंतर आपला सर्व्हे नंबर टाकून तो सातबारा उपलब्ध आहे का ते पाहावे लागेल. तो उपलब्ध असल्यास सातबारा दिसतो तो डाऊनलोड करायचा आहे. अशाप्रकारे अवघ्या ५ मिनिटात १५ रुपयांत हा डिजिटल स्वाक्षरी सातबारा काढता येतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment