हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. आज म्हणजेच 22 मार्च रोजी देशात सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. देशात 22 कॅरेट 1 तोळा सोन्याची किंमत 47,400 आहे, जी आदल्या दिवशी 47,300 होती. म्हणजेच 10 ग्रॅममागे 100 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे आज चे भाव
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,510 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,810 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51710 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51790 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि २२ कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. तसेच त्यात २ कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.