नवी दिल्ली । भारतीय रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) ची 4600 कोटी रुपयांची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. आयआरएफसी ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून ती भारतीय रेल्वेमार्फत (Indian Railway) भारत सरकारची आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीच्या वर्गवारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये रजिस्टर्ड आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) चा हा पहिला आयपीओ असेल.
आयआरएफसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमिताभ बॅनर्जी यांनी नुकतेच सांगितले की, सुमारे 4,600 कोटी रुपयांचा आयपीओ सुरू करण्याची योजना आहे. हा आयपीओ 18 जानेवारी रोजी उघडेल आणि 20 जानेवारीला बंद होईल.
डिपार्टमेंट ऑफ इनवेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंटच्या सचिवांनी ट्विट केले की, IRFC 25 ते 26 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये 4,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयपीओ जारी करेल. ज्यामध्ये अँकर बुक 15 जानेवारी रोजी उघडेल आणि मेन बुक 18-20 जानेवारी दरम्यान खुले होईल.
IRFC ची स्थापना 12 डिसेंबर 1986 रोजी झाली
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) ची स्थापना 12 डिसेंबर 1986 रोजी देशांतर्गत तसेच विदेशी भांडवलाच्या बाजारपेठेतून फंड गोळा करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या समर्पित अर्थसहाय्याने केली गेली. अमिताभ म्हणाले की, आयपीओमुळे कंपनीचे मूल्य आणखी वाढेल आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे निकष आणखी वाढतील. यामुळे कंपनीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2017 मध्ये पाच रेल्वे कंपन्यांना मान्यता दिली. त्यापैकी आयआरकॉन इंटरनेशनल लिमिटेड, राइट्स लिमिटेड, रेल विकास निगम लिमिटेड आणि इंडियन रेल्वे केटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (IRFC) यापूर्वीच लिस्टेड आहेत.
अर्ज कसा करावा
इतर कोणत्याही आयपीओ प्रमाणे, कोणीही त्यांच्या बँकेत उपलब्ध असलेल्या ब्लॉक्ड रकमेद्वारे डेडिकेटेड अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करू शकतो. याशिवाय आयपीओ फॉर्मद्वारेही अर्ज करता येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.