हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Golden Razor) एकीकडे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी आवाक्याबाहेरचा विषय होऊ लागला आहे. असे असताना जर तुम्हा सोन्याच्या वस्तराने दाढी करायला मिळणार असेल तर असा थाट कुणाला नको वाटेल? ही केवळ कल्पना नाही बरं का. तर हे वास्तव आहे. सांगलीतील एका सलूनमध्ये चक्क सोन्याच्या वस्तराने ग्राहकांची दाढी करून दिली जातेय. यासाठी खास ८ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा बनवण्यात आला आहे. चला तर या अजब संकल्पनेबाबत खास गोष्टी जाणून घेऊया.
शिराळा एकदम निराळा
सांगलीच्या शिराळ्यामध्ये ही अनोखी संकल्पना राबवली जात आहे. शिराळ्यातील नाभिक व्यावसायिक देसाई बंधू यांनी आपल्या ग्राहकांसाठी ही खास सुविधा म्हणा किंवा उपक्रम सुरु केला आहे. ग्रामीण भागात हा ८ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा (Golden Razor) पाहण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी देसाई बंधूंच्या सलूनमध्ये ग्राहक मंडळींची मोठी गर्दी होताना दिसते आहे.
८ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा (Golden Razor)
शिराळा तालुक्यातील रिळे या गावात नाभिक समाजातील अशोक शंकर देसाई यांचे वडीलोपार्जित हेअर कटिंग सलून अर्थात केश कर्तनालयाचे दुकान आहे. हे दुकान गेल्या अनेक दशकांपासून सुरु आहे आणि त्यामुळे देसाईंची ख्याती गावभर आहे. अशोक देसाई यांना अमोल आणि प्रदीप नावाची दोन मुले आहेत. ज्यांनी वडिलोपार्जित दुकानाचा कायापालट केला आणि त्याला वातानुकूलित दुकान केले. इतकेच नव्हे तर ग्राहकांना दाढी करताना एक वेगळीच फिलिंग देण्यासाठी त्यांनी ८ तोळे वजनाचा वस्तारा बनवून घेतला.
फक्त १०० रुपयांत करा सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी
अशोक देसाई यांची परिस्थिती तशी बेताची आणि सर्वसामान्य आहे. अशो देसाई यांना त्यांच्या काळात पत्नीची तर आता मुलांची साथ लाभली आहे. थोरला अमोल आणि धाकटा प्रदीप दोघांनीही आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाचे सोने करायचे ठरवले आहे त्यामुळे ग्राहकांना तत्पर सेवा प्रदान करण्या हेतू त्यांनी दुकानात बरेच बदल केले. प्रामाणिक व्यवसाय आणि तत्पर सेवेसोबत ग्राहकांसाठी आकर्षण ठरेल अशी त्यांनी शक्कल लढवली.
(Golden Razor) ग्राहकांची दाढी करण्यासाठी त्यांनी ८ तोळे वजनाचा वस्तरा बनवून घेतला. सोन्याचा वस्तरा असला तरीही भेदभाव कुठेच नाही. त्यामुळे सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करायची असेल तर फक्त १०० रुपये मोजावे लागतात. यामुळे सर्वसामान्य ग्राहक देखील सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करण्याचा अनुभव घेऊ शकतात.
ग्राहकांची वाढती गर्दी
देसाईंची दोन्ही मुले गेल्या २० वर्षापासून नाभिक व्यवसायात कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या सोयीसुविधांकडे ते कायम लक्ष देत आले आहेत. त्यांच्या प्रामाणिक आणि उत्तम कार्यशैलीमुळे आधीपासूनच त्यांच्याकडे ग्राहकांचा ओढा होता. शिवाय माफक दरामध्ये सेवा प्रदान करण्यासाठी देखील या दुकानाची विशेष ओळख. (Golden Razor) या दरम्यान सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी असा अनोखा उपक्रम राबविल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आणखीच वाढताना दिसते आहे.
.. म्हणून बनवला सोन्याचा वस्तरा
सोन्याचे आत्ताचे दर पाहता सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी आवाक्याबाहेर गेली आहे. असे असताना सोने विकत घेणे नाही पण निदान सोन्याच्या वस्तराने दाढी केल्याचा एक आनंद त्यांना घेता येईल, असा मानस बाळगून दोन्ही मुलांनी हा उपक्रम राबविण्याचे योजिले. (Golden Razor) गेल्या काही वर्षात व्यवसायातून केलेली कमाई वापरून त्यांनी एखादा सोन्याचा दागिना बनवायचा असे नक्की केले होते. तसे त्यांनी आई वडिलांना देखील सांगितले. ज्यासाठी देसाई दाम्पत्याने त्यांना परवानगी दिली आणि अखेर त्यांचा मानस पूर्ण झाला.
सोन्याच्या वस्तऱ्याची किंमत
अमोल आणि प्रदीप दोन्ही भावांनी व्यवसायातून एक बचत संचयनी सुरू केली आणि १० ते १५ वर्षाच्या कमाईतून त्यांनी ८ तोळ्याचा सोन्याचा वस्तरा विकत घेतला. ज्याची किंमत जवळपास साडेपाच लाख रुपये इतकी आहे. सध्या हा सोन्याचा वस्तरा पाहण्यासाठी आणि त्याने दाढी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. अनेक ग्राहक प्रतीक्षेत थांबतात आणि सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करून घेतात. अशाप्रकारे देसाई बंधू सोन्यासारख्या ग्राहकांची सोन्याच्या वस्ताऱ्याने सेवा करत आहेत. (Golden Razor)