गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – गोंदिया जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. एका आदिवासी शाळेतील 120 मुला-मुलींना (students) एकाच ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून प्रवास करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अशा बेजबाबदार कामामुळे काही विद्यार्थी विद्यार्थिनींची (students) प्रकृती बिघडली आहे.
चक्क 120 मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवास, गोंदियामधील धक्कादायक प्रकार pic.twitter.com/j5zMmS4K2p
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 25, 2022
विद्यार्थ्यांची प्रकृती एवढी गंभीर झाली की त्यांना थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. हे विद्यार्थी (students) शासकीय आदिवासी शाळा मजीतपूर येथील असल्याची बाब समोर आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी कोयलरिया आश्रम शाळेत घेऊन जाण्यात आले होते. तिथून परत निघताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे. एका ट्रकमध्ये एवढ्या मुला मुलींना अक्षरशः कोंबल्यामुळे श्वास घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना (students) त्रास झाल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध पडले. आणि गाडीत एकच गोंधळ उडाला.
या गोंधळानंतर अखेर गाडी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जाण्यात आली. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर (students) उपचार सुरू आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर शाळा प्रशासनावर मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकरणांमुळे संबंधितांवर प्रशासन काही कारवाई करेल का ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?