Airtel Recharge plan : देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. अशा वेळी मोबाइलचे रिचार्ज देखील महाग होत आहेत. मात्र आता तुम्ही स्वस्त रिचार्ज प्लॅनचा अनुभव घेऊ शकता. कारण जर तुम्ही Jio आणि Airtel चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्यात प्रीपेड प्लॅन्सबाबत जोरदार स्पर्धा सुरू आहे. ज्यामध्ये तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लानचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही कंपन्या युजर्सना अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना या स्पर्धेत पूर्ण फायदा मिळू शकतो. अलीकडेच जिओने त्यांचे Jio TV प्रीमियम प्लॅन लॉन्च केले आहेत. यामध्ये 398 रुपयांचा प्लॅन आहे. हा प्लॅन 14 OTT सबस्क्रिप्शन आणि दररोज 2GB डेटासह येतो. त्याच वेळी, एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये 399 रुपयांचा प्लॅन आहे, जी जिओच्या या प्लॅनला टक्कर देते. अशा वेळी तुमच्यासाठी कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे हे तुम्ही सविस्तर जाणून घ्या.
जिओचा 398 रुपयांचा प्लॅन जाणून घ्या
जिओने तुमच्यासाठी 28 दिवसांचा हा प्लॅन आणला आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2 GB डेटा मिळेल. कंपनी पात्र वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे. तसेच प्लॅनमध्ये, तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. हा प्लॅन अनेक OTT अॅप्सच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. यामध्ये Sony Liv, Zee5, Jio Cinema Premium आणि Jio TV सोबत अनेक अॅप्सचा समावेश आहे.
एअरटेलचा 399 रुपयांचा प्लॅन जाणून घ्या
एअरटेलचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 जीबी डेटा देत आहे. कंपनीच्या 5G नेटवर्क क्षेत्रात राहणाऱ्या वापरकर्त्यांना अमर्यादित 5G डेटा देखील दिला जात आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS सह, तुम्हाला Airtel Xstream Play चे सब्सक्रिप्शन मिळेल, जे 15 पेक्षा जास्त लोकप्रिय OTT अॅप्समध्ये प्रवेश देते. अशा प्रकारे तुमच्यासाठी एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन उत्तम आहे.