पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ! आता तुम्ही घरबसल्या वार्षिक लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकाल, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । लोकांच्या सुविधा वाढवण्याच्या दिशेने केंद्र सतत कार्यरत आहे. यावेळी आता 80 वर्षांपेक्षा जास्त वयोवृद्ध पेन्शनधारकांसाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वास्तविक, पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाऊन वार्षिक लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. सर्टिफिकेट सादर न केल्यास त्यांची पेन्शन देखील थांबवली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या मते, वृद्ध पेन्शनधारकांना हे सर्टिफिकेट सादर करण्यासाठी बँकेत येण्याची गरज नाही. आता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे 1.89 लाख टपाल सेवक हे सर्टिफिकेट त्यांच्या घरून घेऊन बँक किंवा संबंधित विभागाकडे जमा करतील.

केंद्र सरकारच्या मते, पोस्ट ऑफिसमध्ये 1.36 लाखांहून अधिक डेस्कवर वार्षिक लाईफ सर्टिफिकेट सादर केली जाऊ शकतात. त्याच वेळी, पेंशनधारकाच्या वतीने नियुक्त अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले लाईफ सर्टिफिकेट वैध असेल. तसेच, पेन्शनधारक पोर्टलद्वारे घर बसल्या वार्षिक लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. 20 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, पेन्शनधारकांना स्वतः बँकेला भेट देण्याची गरज नाही. पूर्वी हे सर्टिफिकेट दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात सादर करायचे असते. आता ते नोव्हेंबर महिन्यात जमा केले जाते.

स्वाक्षरीसाठी नामांकित अधिकाऱ्यांची यादी तयार
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, CPAO ने जारी केलेल्या प्लॅन बुकनुसार पेन्शनधारकांना घरबसल्या सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्लॅन बुकनुसार, वार्षिक लाईफ सर्टिफिकेटवर स्वाक्षरी करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने MeitY च्या सहकार्याने नोव्हेंबर 2020 मध्ये पेन्शनधारकांसाठी हा उपक्रम सुरू केला. पोस्टमनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी डोअर स्टेप सर्व्हिस देण्याची तरतूद आहे. यासाठी, विभागाने देशभरात पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या नेटवर्कचा वापर केला. ते डिजिटल स्वरुपात सर्टिफिकेट सादर करण्याची घरोघरी सुविधा पुरवतात.

पेन्शनधारक ‘या’ सुविधेचा लाभ कसा घेऊ शकतात ?
1. पेन्शनधारक ‘या’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी Google Play Store वरून Postinfo App डाउनलोड करतात.
2. DoPPW ने 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमध्ये वार्षिक लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा देखील दिली आहे.
3. पेन्शनधारक http://doorstepbanks.com आणि http://dsb.imfast.co.in/doorstep/login वापरू शकतात.
4. 18001213721, 18001037188 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधूनही सुविधेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment