नवी दिल्ली । देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा दिली आहे. SBI ने तंत्रज्ञान आणि ऑनलाईन बँकिंग ऍडव्हान्स करणे सुलभ केले आहे. आता SBI ग्राहक घर बसल्या चेक पेमेंट कॅन्सल करू शकतात. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात …
इंटरनेट बँकिंगद्वारे चेक पेमेंट अशा प्रकारे थांबवता येऊ शकते
1 Onlinesbi.com वर लॉग इन करा.
2 e Service सेक्शन वर क्लिक करा Stop Cheque Payment ऑप्शनवर क्लिक करा.
3 आपण ज्या खात्यासाठी चेक जारी केला आहे त्याचा क्रमांक निवडा.
4 टाइप ऑफ चेक पर्याय निवडा.
5 Stop Reason वर जाऊन आपण पेमेंट थांबवू इच्छित असलेल्या कारणावर क्लिक करा.
6 SBI ची ही सेवा विनामूल्य नाही. सर्विस कंफर्म होताच आपल्या बँक खात्यातून चार्ज कट करण्यात येईल.
7- Submit वर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा डिटेल्स चेक करा. त्या नंतर कंन्फर्म करा.
8- संपूर्ण प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक मेसेज येईल. येथे आपल्याला सर्व डिटेल्स मिळतील.
Yono Bank मार्फतही पैसे देखील थांबवले जाऊ शकतात
SBI Yono App वर लॉग इन करा.
Request पर्यायावर क्लिक करून Cheque Book वर जा. Stop Cheque सिलेक्ट करा.
खाते क्रमांक निवडा.
चेक नंबरचे सुरुवातीचे आणि शेवटचे चार अंक एंटर करा.
चेक पेमेंट थांबविण्याचे कारण लिहा.
Submit वर क्लिक करा. आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल, लिहिल्यानंतर, पेमेंट प्रक्रिया थांबविली जाईल.
जर एखाद्या व्यक्तीला बँकेत जाऊन पेमेंट देणे थांबवायचे असेल तर त्याला कारण सांगून एक पत्र द्यावे लागेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा