नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन आयटी पोर्टलच्या तांत्रिक उणिवांबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,”नवीन टॅक्स पोर्टलमध्ये येणाऱ्या समस्या येत्या 2-3 आठवड्यांत पूर्णपणे दुरुस्त केल्या जातील. याआधी, देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सर्व्हिस देणारी कंपनी इन्फोसिसनेही म्हटले होते की, या त्रुटी दूर करण्यासाठी ते त्वरीत काम करत आहे. यानंतर, अर्थ मंत्रालयाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आशा व्यक्त केली की, पोर्टल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सामान्यपणे काम करण्यास सुरूवात करेल.
इन्फोसिसला 2019 मध्ये कंत्राट मिळाले
इन्फोसिसला पुढील पिढीची इन्कम टॅक्स भरण्याची सिस्टीम विकसित करण्यासाठी 2019 मध्ये कंत्राट देण्यात आले. यामागील उद्दीष्ट रिटर्नची छाननी वेळ 63 दिवसांवरून एक दिवसावर आणणे आणि रिटर्नच्या प्रक्रियेला गती देणे हा होता. यानंतर 7 जून 2021 रोजी नवीन इन्कम टॅक्स पोर्टल www.incometax.gov.in सुरू करण्यात आले. अगदी सुरुवातीपासूनच पोर्टलवर तांत्रिक समस्या येऊ लागल्या. यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 जून रोजी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
The glitches in the new income tax portal are expected to be fixed entirely in the next 2-3 weeks: Finance Minister Nirmala Sitharaman
(File photo) pic.twitter.com/zoUNLpdM7z
— ANI (@ANI) August 16, 2021
केंद्राने संसदेतही पोर्टलच्या त्रुटी स्वीकारल्या होत्या
केंद्र सरकारने नवीन पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याचे संसदेत मान्य केले होते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलशी संबंधित 700 ई-मेल मिळाल्याचे केंद्राने म्हटले होते. त्यापैकी 2000 पेक्षा जास्त तक्रारी होत्या. नवीन ई-फाइलिंग वेबसाईटमध्ये युझर्सना 90 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले होते की,” नवीन ई-फाइलिंग वेबसाईट तयार करणाऱ्या इन्फोसिसला पोर्टलच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींविषयी माहिती देण्यात आली आहे.”