व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी ! तुमच्यासाठी येत खास ‘हे’ फिचर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या युजर्सचा अनुभव उत्तमोत्तम करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून दरवेळी काही नवनवीन फीचर्स आणले जातात. व्हॉट्सअ‍ॅप आता अशा नव्या फीचरवर काम करत आहे ज्यामध्ये युजर्सना त्यांच्या कॉन्टॅक्टमधील व्यक्तींना व्हिडीओ पाठवण्यापूर्वी त्याची क्वालिटी तपासण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडीओ पाठवताना हाय-क्वालिटी व्हिडीओ रिझॉल्युशन निवडण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही आहे. सध्या हाय-क्वालिटी असणारे व्हिडीओ WhatsApp च्या माध्यमातून पाठवले जातात तेव्हा के कम्प्रेस्ड करून किंवा डॉक्यूमेंटच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजर्ससाठी या नव्या फीचरवर काम करत आहे, ज्यामध्ये युजर्सना क्वालिटी निवडता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडीओ युजर्सना पाठवता न येणे हा एक खराब अनुभव असू शकतो. ज्यावर सध्या व्हॉट्सअ‍ॅप काम करत आहे. WaBetaInfoकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप या फीचरची सध्या चाचणी करत आहेत. ज्यामुळे युजर्सना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना हाय क्वालिटी व्हिडीओ पाठवता येणे शक्य होईल. हे नवीन फीचर अँड्रॉइट बीटा बिल्डमध्ये स्पॉट करण्यात आले होते. WabetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार युजर्सना व्हिडीओ पाठवण्यासाठी तीन पर्याय देण्यात येतील.

पहिला पर्याय हा ऑटो मोड आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओची क्वालिटी स्वत: निवडेल आणि त्यामध्ये एक चांगला कम्प्रेशन अल्गोरिदम प्रदान करण्यात येईल. दुसऱ्या पर्यायात युजरला चांगली क्वालिटी निवडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. यामध्ये युजर त्याच्या आवश्यकतेनुसार चांगल्या क्वालिटीचा पर्याय निवडू शकतो. या पर्यायामुळे जर युजरने कोणताही व्हिडीओ हाय-रिझॉल्युशनमध्ये शुट केला असेल तर तो व्हिडीओ त्याच क्वालिटीमध्ये त्याला समोरच्याला पाठवता येणार आहे. तिसरा पर्याया डेटा सेव्हरचा असणार आहे. जर युजरने हा पर्याय निवडला तर व्हॉट्सअ‍ॅपकडून हा व्हिडीओ पाठवण्याआधी कम्प्रेस करण्यात येईल. व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकरमधून अशी माहिती देण्यात आली आहे कि हे फीचर अद्याप विकसीत होत आहे आणि लवकरच भविष्यात ते युजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

Leave a Comment