नवी दिल्ली । केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारच्या पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची मदत घेऊ शकतात. यामध्ये शेतकरी निम्म्या किंमतीत शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. खरं तर, या योजनेत केंद्र सरकार नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्क्यांपर्यंत सबसिडी देते. ज्यासाठी शेतकऱ्यांना फक्त काही कागदपत्रांचीच गरज आहे.
देशात असे अनेक शेतकरी आहेत जे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. तो एकतर भाड्याने ट्रॅक्टर घेतो किंवा बैलांच्या सहाय्याने शेती करतो. अशा शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सरकारने PM किसान ट्रॅक्टर योजना आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर मिळतो.
50 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सबसिडी देते. याअंतर्गत शेतकरी कंपनीकडून अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम सरकार देईल. याशिवाय अनेक राज्य सरकारेही त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 % सबसिडी देतात.
‘या’ योजनेचा लाभ घ्या
सरकार फक्त एका ट्रॅक्टरवर सबसिडी देते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे किसान आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक डिटेल्स, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पीएम किसानचा पुढील हप्ता 15 तारखेला येईल
पुढील आठवड्यात करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचा नवीन हप्ता येणार आहे. त्यासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यासाठीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर 2021 पर्यंत तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी पैसे मिळतील. यावेळी नाताळपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.