शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देण्यावरून भाजप नेत्यांकडून राऊतांवर निशाणा साधण्यात आला. त्यांना उत्तर देताना राऊतांनी पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत आज भाजप नेते आक्रमक झाले असून संजय राऊत यांनी जी वक्तव्ये केले आहे त्याबाबत त्याच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्यानंतर भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांच्याकडून राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, दिल्ली येथे खासदार शरद पवार यांना बसण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खुर्ची दिली होती. त्यावरून भाजप नेत्यांनी रौतावर टीका केली होती. भाजप नेत्यांच्या टीकेला उत्तर देताना राऊतांनी अपशब्द पावरले. त्यामुळे भाजप नेते अशीही शेलार यांच्यावर ज्या पद्धतीने महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोप किती तक्रार दाखल केली. त्या पद्धतीने राऊतांविरोधातही तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भाजप नेते आशिष शेलार व प्रवीण दरेकर यांनी दिला होता.

त्यानंतर भाजप नगरसेविका शीतल कुंभार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत याचा विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भाजपवर टीका करताना राऊतांनी अपशब्द वापरले असल्याचा आरोप भाजप नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here