गुडन्यूज : सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्जाच्या व्याजदरात कपात

DCC Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक मंडळाने क्रांतिकारक निर्णय घेतला असून 1 मेपासून कर्जाच्या व्याजात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई व सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देशभरात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आत्तापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. शेतकऱ्यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवणारे बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख होतो.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून व थेट बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेती व शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळणार मिळावी. या उद्देशाने विविध कर्जांचे वाटप करत असते. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून व्याजदरात 1 ते 3 टक्केपर्यंत कपात करण्यात आली आहे.