विशेष प्रतिनिधी । सतेज कांती आणि चिरकाल टिकणारे तारुण्य हि प्रत्येक तरुणीची इच्छा असते . यात आता पुरुषही मागे नाहीत . सतेज आणि निरोगी त्वचेसाठी सलून्स आणि औषधे , कॉस्मेटिकसवर भरमसाठ खर्च देखील केला जातो . पण या उपायांमधून चांगला परिणाम मिळेलच हे मात्र नक्की नसते . पण केवळ तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने दीर्घकाळ टिकणारे हे परिणाम मिळतील यात शंका नाही .
१. तांब्याच्या भाड्यात साठवलेले पाणी नियमित प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येते .
२. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते .
३. पिंपल आणि मुरूम येणे बंद होते .
४. शरीरातील पित्त, वात,कफ नाहीसे होतात .
५. शरीरातील उष्णता कमी होते .
६. तांब्यातील गुणांमुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत होते .
७. शरीरातील पीएच लेव्हल संतुलित ठेवला जातो .