हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्ताननं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. या नवीन नियमामुळे फेसबुक, ट्विटर आणि गुगलनं या कंपन्यांना पाकिस्तानमध्ये आपली सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. पाकिस्तान सरकारने हे नवीन नियम मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र ‘एशिया इंटरनेट कॉलिशन’तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान दिले गेले आहे. मात्र, सदर नियमांमध्ये बदल न केल्यास पाकिस्तानमध्ये सेवा बंद करू असा कडक इशारा सुद्धा पत्रातून इम्रान खान यांना या कंपन्यांनी पत्रातून दिला आहे.
पाकिस्तानने आणलेल्या नव्या नियमांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना इस्लामाबादमध्ये आपलं कार्यालय सुरू करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडिया कंपन्यांना पाकिस्तानातच डेटा सेंटर सुरू करावं लागणार आहे. पाकिस्तानच्या नियमानुसार जर कोणताही पाकिस्तानी नागरिक सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून सरकार आणि कोणत्याही संस्थेला जर लक्ष्य करत असल्याचा दोषी सिद्ध झाला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना संशयाच्या आधारावर कोणत्याही नागरिकाचा अकाऊंट तपासण्याचीही मुभा याद्वारे देण्यात आली आहे.
तसंच त्यांना युझर्सचा डेटाही सरकारसोबत शेअर करावा लागणार आहे. जर कोणतीही माहिती सरकार किंवा संस्थेच्या विरोधात असेल तर सोशल मिडिया कंपन्यांना त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढावं लागणार आहे. १५ दिवसांमध्ये संबंधितावर कारवाई न केल्यास सरकार त्यांच्यावर ५०० दशलक्ष पाकिस्तानी रूपयांचा दंड ठोठावणार आहे. त्यामुळं एआयसीतर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रात कंपनी युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करणार नाही कारण ते गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असेल असं नमूद करण्यात आलं आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.