नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलला सगळेच ओळखतात. या गुगलने अनेक मार्गांनी लोकांचे जीवन सुलभ केले आहे. आता हेच गुगल एक असे फीचर आणण्याचे विचार करत आहे ज्यामुळे लोकांपर्यंत जेवण पोहोचवले जाऊ शकते. यासाठीच गुगलने फूड सपोर्ट टूल लाँच केले आहे. गुगलचे हे पाऊल फूड फॉर गुड टीमचा एक भाग आहे.
गुगलने याला Find Food Support असे नाव दिले आहे. यामध्ये फूड लोकेटर टूल देण्यात आले आहे. फूड लोकेटर टूलला Google Maps द्वारे वापरता येणार आहे. याच्या मदतीने युजर्स आपल्या जवळची फूड बँक, फूड पँट्री किंवा स्कूल लंच प्रोग्राम सर्च करू शकणार आहे. आपल्या कम्युनिटीमधून ते साइट पिकअप करू शकतात. यासाठी गुगल अनेक नॉन-प्रॉफिट ग्रुप्स सोबत काम करत आहेत.
या कामासाठी गुगलने नॉन-प्रॉफिट No Kid Hungry आणि FoodFinder अशा संस्थांशी करारदेखील केला आहे. याव्यतिरिक्त गुगल यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरसह काम करत आहे. यामुळे गुगल अमेरिकेतील 50 राज्यांत 90000 ठिकाणी फ्री फूड सपोर्ट देऊ शकेल.गुगलने येणाऱ्या काळात यामध्ये लोकेशन जोडणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनामुळे अमेरिकेत अनेक लोकांना अन्नाच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता.अमेरिकेत अन्नाच्या कमतरतेमुळे 7 पैकी एक अमेरिकी प्रभावित झाला होता. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश होता. अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये आणि सध्याच्या काळात सर्वांपर्यंत जेवण पोहोचावे यासाठी गुगलने हे पाऊल उचलले आहे.