Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या

Google Pixel 6a
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गूगल पिक्सल 6a हा मोबाइल (Google Pixel 6a) फोन भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर प्री-बुकिंगसाठीही उपलब्ध झाला असून हा मोबाईल नथिंग फोन (1), Oppo Reno 8 Pro आणि OnePlus Nord 2T ला तगडी फाईट देईल. चला आज आपण जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि यामध्ये असलेले फीचर्स याबाबत…

6.1-इंच डिस्प्ले- 

गूगल पिक्सल 6a च्या फीचर्स (Google Pixel 6a) बाबत बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनला 6.1-इंच OLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असून हा डिस्प्ले ड्युअल-टोन मेटल आणि ग्लास डिझाइनसह येतो. या मोबाइल फोनचे डायमेंशन 152.2×71.8×8.9mm आणि वजन 178 ग्रॅम आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनला ऑक्टा कोअर गुगल टेन्सर एसओसी आणि टायटन एम2 सिक्युरिटी कॉप्रोसेसर देण्यात आला आहे.

 

कॅमेरा- (Google Pixel 6a)

मोबाईलच्या कॅमेरा बाबत बोलायचं झालं तर गूगल पिक्सल 6a ला 12-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा तसेच 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Google Pixel 6a

4410 mAh बॅटरी-

गूगल पिक्सल 6a ला 4410 mAh बॅटरी (Google Pixel 6a) आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्टर आहे. हा स्मार्टफोन IP67 वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. याशिवाय मोबाईल मध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

Google Pixel 6a

किंमत 43,999 –

गूगल पिक्सल 6a स्मार्टफोन (Google Pixel 6a) भारतात 6GB + 128GB स्टोरेज मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, या स्मार्टफोनची किंमत 43,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Chalk आणि Charcoal या दोन रंगांमध्ये मिळू शकतो . मोबाइल खरेदीच्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, अॅक्सिस बँक कार्डने प्री-बुकिंगवर 4,000 रुपयांची सूट दिली आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत 19,000 रुपयांपर्यंत सूट आहे. तसेच तुम्ही दरमहा रु. 1,504 च्या EMI वर देखील फोन खरेदी करू शकता.

Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत

Oppo Reno 8 Pro : दमदार फीचर्ससह लॉंच झाला Oppoचा Reno8 Pro; पहा किंमत आणि सर्वकाही

iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स